या झोपडीत माझ्या..
November 30, 2006
संत तिकडोजीच्या कवितांमध्ये एक वेगळीच गोडी असते. या स्वछंद चालीच्या, साधी रचना असलेल्या आणि सरळ सोप्या अर्थाच्या कविता पाचवी सहावीच्या पुस्तकात हमखास सापडतील. मला सर्वात जास्त आवडली ती त्यांची या झोपडीत माझ्या ही कविता. वेबवर न मिळाल्यामुळे, त्याची प्रत इथे उपलब्ध करावी असे वाटले…म्हणून हा प्रयत्न.
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥
महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥
पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥
- संत तुकडोजी महाराज.
November 30, 2006 at 8:24 am
Krishnakanth, kavitaa chhaan aahe. yethe upalabdha karoon dilyaabaddal dhanyavaad.