फणस की डुरियन?

परवा ऑफिसमधील एका युरोपियन माणसा बरोबर जेवायला गेलो होतो. हा माझा सहकारी युरोपियन जरी असला तरी जग फिरला आहे. त्याला विशेष आवडीचा प्रदेश म्हणजे दक्षिण-पूर्व एशिया (विशेषकरून ईंडोनेशिया)! तर आमचे असेच भारत-ईंडोनेशिया विषयी गप्पा चालु होत्या. त्याने मला एक प्रश्न विचारला…

मला म्हणे की तुमच्या इथे ते मोठे पिवळट-हिरवे फळ मिळते का? त्या फळा चे नाव मात्र त्याला आठवत नव्हते 😦
मला म्हणे की ते फळ कलिंगडा येवढे मोठे असते. पण त्याचे वरचे आवरण फारच कडक असते, त्याला असे काटे असतात (thorns ). त्या फळाला म्हणे खूप उग्र वास असतो. त्याच्या आत मध्ये माऊ पिवळ्या रंगाचा गर असतो….

फणस

आता हे सगळे ऐकल्यावर मी एकदम म्हणालो की “फणस”. पण मला फणसाचे इंग्रजी मधील नाव काही केल्या तेव्हा आठवले नाही…आम्ही ती चर्चा मग तिथेच थांबवली.

माझी मात्र फणसाचे इंग्रजीतील नाव का आठवत नाही आहे यामुळे थोडी चिडचिड झाली होती. परत कामावर आल्यावर “फणस” देवनागरीत गुगल केले आणि एकदम “Jackfruit” आठवले! मग त्या मित्राला ” तुला Jackfruit म्हणायचे होते का?” असा ईमेल केला. सोबत फणसाचे विकिपेडियावरचे वेबपेज सुद्धा जोडले.

तर त्या पठ्याने मला परत ईमेल केला जो मला फारच “Interesting” वाटला. तो म्हणे…” ha ha…I was NOT talking about Jackfruit……Now I need to taste Jackfruit and you Durian!” त्याने सोबत डुरियनची माहिती देणारे विकिपेडियाचे वेबपेज सुद्धा जोडले होते. त्यावर टिचकी मारली तर काय आश्चर्य…अगदी फणसाचा भाऊ/बहिण वाटत होतं हे डुरियन म्हणजे! (सोबत डुरियनचे चित्र जोडत आहे)

डुरियन (विकिपेडिया छायाचित्र)

मग मात्र मी खरचं उत्सुक झालो. गुगल वर ” Durian Jackfruit”  असे शोधले तर भरपूर माहिती मिळाली. बाहेरून दिसायला जरी फणस आणि डुरियन सारखे दिसत असले तरीही त्या दोघांमध्ये बराच फरक आहे म्हणे. त्यातील काही प्रमुख फरक असे:

१) लोकांचे म्हणणे असे आहे की डुरियन ची चव आंबा-केळे-चीझ-कांदा-लसूण एकत्र केले तर कसे लागतील तशे असते….बापरे!!…थोडक्यात लोक म्हणतात की तुम्हाला डुरियन एकतर प्रचंड आवडेल किंवा अजिबात आवडणार नाही! फणस गोडसर असल्यामुळे ब-याच लोकांना आवडतो.
२) डुरियनचा वास फरच उग्र असतो. काही लोकांना तो वास बिलकूल आवडत नाही तर काहींना तो प्रचंड आवडतो. फणसाचा वास त्यामनाने बराच मवाळ आहे.
३) डुरियनचे कवच फणसापेक्षा जास्त कडक व कापण्यास अवघड असते
४) डुरियनच आकार फणसापेक्षा थोडा लहान असतो पण त्याचे काटे फणसापेक्षा बरेच मोठे असतात

आपल्याकडे जसं नारळाला मान आहे तसचं दक्षिण-पूर्व एशियात डुरियनला आहे म्हणे. तिकडे त्याला “फळांचा राजा” म्हणतात. ईंडोनेशिया, मलेशिया आणि ब्रुनेई हे डुरियचे मूळ देश. मात्र आता थायलंड, फिलिपिन्स ई. ठिकाणी सुद्धा त्याची लागवड केली जाते. भारतातही डुरियचे पिक काही ठिकाणी घेतले जाते असे वाचण्यात आले आहे.

मागच्या भारत दौ-यात एकदा विलायती फणसाचे झाड बघितले होते. विलायती फणसाचा आकार नेहमीच्या फणसापेक्षा थोडा छोटा होता. मग  मनात विचार आला की आपण ज्याला विलायती फणस म्हणतो तोच डुरियन का?

विलायती फणस

काल माझ्या मामी बरोबर या विषयावर बोललो. ती कोकणात वाढलेली आणि तिच्या माहेरी आंबा-फणसाच्या बागा आहेत. ती म्हणाली की विलायती फणस नेहमीच्या फणसा-सारखाच असतो. त्यामुळे विलायती फणस हा डुरियन नाही आहे. आज आमच्या ऑफिसमध्ये एका थाई मुलीशी डुरियन विषयी विचारले. तीने एका दक्षिण-पूर्व आशियाई सामान मिळणा-या दुकानाचा पत्ता दिला आहे..म्हणे की तिकडे फ्रोझन डुरियन मिळेल. आता ते विकत घेऊन खाईन….

संदर्भ:

  1. http://en.wikipedia.org/wiki/Durian
  2. http://tucsoncitizen.com/morgue/2008/08/27/94926-direct-from-asia-yummy-jackfruit-smelly-durian/
  3. Test
Advertisements

4 प्रतिक्रिया

Filed under इतर

आले रे गणपती आज दारी रे

आले रे गणपती आज दारी रे
बाप्पा मोरया आनंद झाला माझ्या मना भारी रे॥

सजले मखर हे, फूल माळ ओवली
उजळून आरती, तबकात ठेवली।
मोदकही आवडीचा गोडी त्याची न्यारी रे
आले रे गणपती आज दारी रे॥

टाळ झांजा मृदुंगाचा गजरही घुमला,
बालगोपाळांचा मेळा नाचा मध्ये रमला।
देवा गणेशाचा घोष जय जय भारी रे
आले रे आज गणपती दारी रे॥

परवा गणपतीच्या एका कार्यक्रमासाठी ह्या गाण्याचे बोल शोधत होतो. पण इंटरनेटवर कुठेही या गाण्याचे पूर्ण बोल मिळाले नाहीत. पुन्हा कोणीही ते शोधले तर उपलब्ध असावेत म्हणून हा प्रयत्न.

या गाण्याचा व्हिडिओ युट्यूबवर मिळाला. त्याचा दुवा सोबत जोडत आहे.

2 प्रतिक्रिया

Filed under महाराष्ट्र.

Left Hand Driving Vs. Right Hand Driving

नुकताच भारत दौरा करून आलो. प्रत्येक भारत दौ-यामध्ये, अगदी पहिल्या दिवसापासून कार चालवायचा माझा प्रयत्न असतो.

ईथे यु.एस. मध्ये रस्त्याच्या उजवीकडून गाडी चालवायची सवय लागलेली असते. त्यामूळे भारतात रस्त्याच्या डावीकडून गाडी चालवायला पहिल्या दिवशी थोडे अवघड जाते. या right-hand traffic(steering on left hand side of car) ते  left-hand traffic(steering on right hand side of car)च्या बदलामूळे आणि automatic gears ते manual gears च्या बदलामूळे माझ्या हमखास होणा-या चुका म्हणजे:

१) वळताना सवयीप्रमाणे गाडी रस्त्याच्या चुकीच्या बाजूला घेणे

२) Indicator च्या ऎवजी Wiper सुरु करणे

३) Clutchचा अंदाज न आल्यामुळे, half-clutch ला गाडी बंद पडणे

या भारत दौ-याआधी मी हटकून ठरवले होते की या वेळेस पहिल्यापासूनच नीट एकाग्रतेने गाडी चालवायची….चुका करायच्या नाहीत. ठरल्याप्रामाणे भारतात गाडी चालवताना या वेळेस चुका कमी झाल्या….Indicator च्या ऎवजी wiper फक्त दोनदाच चालू केला….आणि clutch चा प्रोब्लेम आलाच नाही. गाडीपण रस्त्याच्या योग्य दिशेने चालवली. त्यामुळे भारतात यथेच्छ कार चालवण्याचा आनंद घेता आला!

पण, मग आता परत यू. एस. मध्ये आल्यावर प्रोब्लेम सुरु झाला….आता मी इथे wiper सुरु करु लागलोय..:D….आणि माझा डावा पाय नकळत नसलेला clutch शोधु लागतोय…..(Murphy’s Law: Every solution leads to a new problem)

World Map showing countried driving left and those driving right of road

(छायाचित्रासाठी संदर्भ: बेंजामिन ईशाम, विकिपेडिया कॉमन्स)

उत्सुकतेपोटी महाजालावर शोधले तर left hand drive-right hand drive बद्दल बरीच माहिती मिळली.  जगात बहुसंख्येने लोक रस्त्याच्या उजव्या बाजूने गाडी चालवतात म्हणे! यु.के., जपान, भारतीय उपखंड, थायलंड-मलेशिया, मध्य-पूर्व अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्येच गाडी रस्त्याच्या डाव्याबाजुने चालवतात. जे देश भारतासारखे डाव्या बाजूने चालवतत ते एकतर बेटे आहेत किंवा भारतीय उप-खंडासारखे त्यांना नैसर्गीक सीमा आहेत.

Left hand drive LFD म्हणजे steering गाडीच्या डाव्या बाजूस असणे आणि गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवणे (left hand drive = right hand traffic). Left hand drive आणि left hand traffic यामध्ये ब-याचवेळा गल्लत होते. भारतात right hand drive (RHD) म्हणजेच left hand traffic आहे.

पुर्वीच्या ब्रिटिश वसाहतींमध्ये रस्त्याच्या डावीकडून चालवतात (उदा: भारत, केनिया ई.). अनेक सत्तांतरे झालेल्या व पाकिस्तानवर भरपूर अवलंबून असलेल्या अफगाणिस्तानात तर गोंधळ आहे म्हणे….काही गाड्या Right hand drive  तर काही left hand drive आहेत! थायलंडला शेजारी असलेले सर्व देश रस्त्याच्या उजवीकडे गाडी चालवतात. त्यामुळे थायलंडच्या सीमेपाशी रस्त्यावर गाडी चालवायची बाजु बदलावी लागते.

काही देशांनी मध्यंतरी left-hand drive वरून right-hand drive ला स्थलांतर केले. सोबतच्या नकाशामध्ये अशा देशांची यादी आहे. १९४६ पर्यंत चीनच्या उत्तर भागांमध्ये गाड्या LHD होत्या तर गुआंगडॉंग व सोबतच्या दक्षिण प्रांतांमध्ये RHD. १९४६ नंतर सर्व चीनमध्ये गाड्या LHD म्हणजे रस्त्याच्या उजवीकडुन चालवु लागले. परंतु १९९७ पर्यंत यु.के. कडे असलेल्या होंगकोंगमध्ये गाड्या भारतासारख्या डावीकडून चालवायचे. आता होंगकोंग चीनकडे असले तरिही तिकडे अजूनही गाड्या डाव्याच बाजूने चालवतात!

संदर्भ: विकिपेडिया

2 प्रतिक्रिया

Filed under इतर

नंदनचे ब्रिटनच्या निवडणूकीवरील प्रेसेंटेशन

माझा मित्र शिवनंदन पिंगळे याने ब्रिटन मधील होऊ घातलेल्या निवडणुकीबाबत माहिती देणारे एक प्रेसेंटेशन पाठवले.

प्रेसेंटेशन मधील मांडणी मला आवडली….व ते तुमच्याबरोबर शेअर करावेसे वाटले

UK_Nivadanuk

यावर आपले मत नोंदवा

Filed under इतर, बातम्या

पाटी

आज ऑफिसमध्ये एक नोटिस वाचली…आणि थेट पुणेरी पाटीची आठवण आली.

त्याचे काय आहे…आमचे ऑफिस सध्या दुस-या जागी शिफ्ट होत आहे. त्यामुळे जो-तो सामान पॅक करण्यासाठी बॉक्सच्या शोधात आहे.

डिपार्ट्मेंटचे बॉक्सेस कोणी घेऊ नयेत यासाठी ऍडमिनिसट्रेटरने ही नोटिस लावली….

१ प्रतिक्रिया

Filed under इतर

यू.एस. मुंबई कॉन्सोलेट मध्ये मराठी दुभाषी उपलब्ध नाही?

यू. एस. मुंबई कॉन्सोलेट मध्ये ईंग्रजी न येणा-या लोकांना मराठी, हिंदी व गुजराती मध्ये वीसा ईंटरव्हू देता येतो. मराठी, हिंदी व गुजराती दुभाषी अशा लोकांना मदत करतात.

पण, माझ्या ओळखितील कोणीही जेव्हा “मराठी दुभाषी पहिजे” असे सांगते तेव्हा कधीच तो उपलब्ध नसतो! त्यांना हिंदी दुभाष्या बरोबर ऍडजस्ट करावे लागते.

असा अनुभव अजून कोणाच्या पालकांना / ओळखितील व्यक्तीला आला आहे का?

मराठी दुभाषी मुंबई कॉन्सोलेट मध्ये खरंच उपलब्ध आहे की नाही या बद्दल मला शंका येत आहे…..

5 प्रतिक्रिया

Filed under महाराष्ट्र.

विरोधाभास

आज सकाळी “The Hindu”  या दैनिकाच्या वेबपजवर बिझनेस सेक्शन मध्ये पहिली बातमी होती:

“With three-day power cut, Andhra industry fears job loss”

आणि त्या बातमीच्या बरोबर खाली ही बातमी होती:

“India among world’s top 3 preferred investment destinations”

प्रगती साठी पायाभूत सोयी सुविधा चांगल्या करण्याची गरज आपल्या सरकारला कधी कळणार?

यावर आपले मत नोंदवा

Filed under बातम्या