कराड – महाराष्ट्रातील प्रयाग !!

कराडचा प्रितीसंगम म्हणजे निसर्गाची एक कलाकृतीच आहे. उत्तरेहून वाहत येणरी कृष्णा आणि दक्षिणेहून येणरी कोयना. दोघी अगदी आमनेसामने येऊन एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पूर्वेला वाहत जातात. असे काटकोनात वाहणे सहसा नद्यांच्या स्वभावातले नाही. पण कराडचा प्रितीसंगम मात्र त्याला अपवाद.

तसं म्हंटले तर कृष्णा आणि कोयना सख्या बहिणीच की..महाबळेश्वर दोघींचेही उगमस्थान. पण दोघींमध्ये केवढा फ़रक!! थोरली बहिण कृष्णा समजुतदारपणे वागणारी. ही लहान मुलीसारखी डोंगरदऱ्यांमध्ये जास्त खेळत बसत नाही. हिला घाई असते ती लवकर पठारावर यायची. तहानलेल्या पिकांना पाणी पाजून ताजेतवाने करण्याची. तर धाकटी बहिण कोयना म्हणजे महा खोडकर….. डोंगरांमध्ये खेळणे हिला फार आवडते. हिचे सगळे मित्र पण असेच रांगडेप्रतापगड, मकरंदगड आणि वासोटा. जावळीचे खोरे म्हणजे यांचे अंगण. पण धाकटी असली तरी अंगात जोर फारअर्ध्या महाराष्ट्राला वीज पुरवते म्हणे ही!

तर अशा या दोघी. अगदी भिन्न स्वभावाच्या पण सख्या बहिणी….जबाबदारीने वागणारी कृष्णा तर डांबरट कोयना, ऊसशेती समृध्द करणारी कृष्णा तर भात पिकवणारी कोयना, वाईच्या गणपतीचे पाय धुणारी कृष्णा तर प्रतापगडावरच्या भवानी मातेला नमन करणारी कोयना. पण कराडला आल्यावर दोघींचाही ऊर दाटून येतो आणि धावत येऊन दोघी एकमेकींना आलिंगन देतात.

उत्तर भारतात जे स्थान गंगायमुनेला तेच महाराष्ट्रात कृष्णकोयनेलाआणि कराड म्हणजे इथलेप्रयाग‘. कृष्णेचा किंवा कोयनेचा एकेरी उच्चार मराठी माणुस सहसा करत नाही. आपण नेहमीकृष्णकोयनाअसेच म्हणतो. उदारणार्थ हे महाराष्ट्रगीत..

रेवा वरदा, कृष्णकोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा.

किंवा आपण शाळेत शिकलेली ही कविता..

कशासाठी पोटासाठी
देशासाठी देशासाठी
गंगा आणि गोदेसाठी
कृष्णकोयना यांच्यासाठी

कराडचा प्रितीसंगम इतका सुंदर आहे की उत्तरालक्ष्मी पासून ते यशवंतराव चव्हाणांपर्यंत सगळेच जण याच्या सौंदर्याला भुलले. त्यामुळेच या संगमावर जसे उत्तरालक्ष्मीचे मंदिर आहे तसेच यशवंतराव चव्हाणांची समाधी पण आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनीराजा शिवछत्रपतीमध्ये कराडच्या प्रितीसंगमाचे फार सुरेख वर्णन केले आहे.

या प्रितीसंगमाच्या पण दोन वेगवेगळ्या छटा आहेत. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात याचे शांत आणि कोमल रुप दिसते तर पावसाळ्यात याने खवळलेल्या समुद्रासारखे रौद्र रुप घेतलेले असते. मराठी माणसाने निदान एकदा तरी कराडच्या या प्रितीसंगमाला जरूर भेट द्यावी.

11 प्रतिक्रिया

Filed under महाराष्ट्र.

11 responses to “कराड – महाराष्ट्रातील प्रयाग !!

  1. Kunal

    This is an excellent description of the Krishna-Koyna sangam.
    It is so impressively written that it makes feel,
    “I should really visit atleast once”.

  2. Sachin Terdalkar

    Rahulyaa,

    Ekdum sahi aaahe re lekh… first paragraph madhech mi karadchya sangamawar jaun pohochalo…. Faarach sahi aahe.

    Sachin

  3. एका क्षणात गावाला पोहोचवले. पुढच्याच आठवड्यात जाणार आहे संगमावर!

  4. Ranjeet

    Hi,

    Khupach Chhan lihile aahes – mastach!!!

    Makes me wish like going to see the sangam and to see every place from where krushna and koyna flow…

    Superb writing, keep it up!!!

    Ranjeet

  5. ABHINAY KULKARNI

    EKDAM KARHADAS POHOCHLO KI.

  6. milan nalawade

    excellent write up . one should visit that at once .

  7. DEAR WRITER,

    YOUR ARTICALE IS TO GOOD TO SEE AND READ.

    KEEPIT UP AND GO HEAD.

    ONE THING FOR YOU IS THAT I READ IT AND GET THE PRINTOUT OF THIS ARTICALE ALSO.

    THANKS FOR YOUR HARDWORK.

    BEST REGARDS,

    RAKESH

  8. तुमचा ब्लॉग खूपच छान आहे…फार आवडला …तुमाला आजुन ल्हीवायला पाहिजे…तुमच कविता फार छान आहे..हीसाईटपहा तुम्ही http://www.quillpad.in/marathi/ हेचणा तुमाला आजुन मदाद वाहील…

  9. your blog is very good for reading i want to go and see krishna koyna sangam i am also mi satarkar.very good poety rhythm

  10. Rajesh Hindurao veer

    karad he aamache atishay ladake shahar aahe.aamchya gava pasun kiman13 km aasanare he shahar mala manapasun aavadate.

  11. Kiran Thuse

    Dear Rahul, Your article is superb. I started imagining about the whole scenario and got drifted to the situation.

    Amazing language and poetry about the topic.

    Wish you all the best and keep writing.

    Love u Baba

Leave a reply to Sachin Terdalkar उत्तर रद्द करा.