या झोपडीत माझ्या..

संत तिकडोजीच्या कवितांमध्ये एक वेगळीच गोडी असते. या स्वछंद चालीच्या,  साधी रचना असलेल्या आणि सरळ सोप्या अर्थाच्या कविता पाचवी सहावीच्या पुस्तकात हमखास सापडतील. मला सर्वात जास्त आवडली ती  त्यांची या झोपडीत माझ्या ही  कविता.  वेबवर न मिळाल्यामुळे, त्याची प्रत इथे उपलब्ध करावी असे वाटले…म्हणून हा प्रयत्न.

 राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली

ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे

प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या

दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला

भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने

आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा

कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे

शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥

 – संत तुकडोजी महाराज.

Advertisements

3 प्रतिक्रिया

Filed under कविता

3 responses to “या झोपडीत माझ्या..

  1. Krishnakanth, kavitaa chhaan aahe. yethe upalabdha karoon dilyaabaddal dhanyavaad.

  2. Rajendra Kulkarni

    THE GREAT PERSONALITY IN INDIAN HISTTORY. TUKDOJI WAS REAL “KOHINOOR” OF INDIA. HE PROOVE THAT HOW TO LEAVE ON EARTH AS AN HUMANBEING. I REEMBER ONE SENTENCE OF RADHAKRISHNAN,HE SAID THAT “MAN FLY JUST LIKE BIRD IN THE SKY,MAN SWIM LIKE FISH IN THE WATER BUT MAN YET TO LEARN HOW TO LEAVE ON EARTH AS AN HUMANBEING ON EARTH.”
    TUKDOJI MAHARAJ PROOVES HOW TO LEAVE ON EARTH AS AN HUMANBEING. I SALUTE TO TUKDOJI MAHARAJ.

  3. suhas ranaware

    hi kavita maze jivan gane aahe.mazya jivanacha ti avibhazya ghatak banliy

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s