स्वदेसमधील चरणपूर

528797560qxbxii_ph.jpg 

या फोटोमधील घाट कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो आहे ना? ..ही नदी……..हे मंदिर.

 नक्की कुठेतरी पाहिली आहे ही जागा! ………पण कुठे?

अहो……हे तर स्वदेस मधले “चरणपूर”! आता आठवले ना तुम्हाला…..

या गावाचे खरे नाव “मेणवली”. वाई पासून धोम धरणाकडे जायला लागले की अवघ्या ४-५ कि. मी.  वर मेणवली लागते, अगदी छोटेसे टुमदार गाव.  नाना फडणीसांनी १८व्या शतकात इथे एक मोठा वाडा, घाट आणि मेणेश्वराचे व विष्णुचे मंदिर बांधले.  एका बाजुला खंबीरपणे उभा असलेला पांडवगड तर दुसऱ्या बाजुला पाचगणीला घेऊन जाणारा पासरणीच्या घाटाचा रस्ता, आणि त्या दोघांमधून वाहणारी कृष्णा नदी. कृष्णेवर बांधलेला हा घाट पाहिला की मेणवलीच्या प्रेमातच पडायला होते. इथली शांतता आणि निवांतपणा मनाला एका क्षणात भावतो.

नाना फडणीसांच्या वाडयाला मोठे ऎतिहासिक महत्व देखिल आहे. त्याचे कारण इथे मिळालेले पेशवेकालीन कागदपत्रे आणि दस्तावेज. नाना फडणीसांच्या वेळेपासून जतन केलेल्या या कागदपत्रांना इतिहासकार “मेणवलीचे दफ्तर” असे म्हणतात. घाटावर चिमाजीअप्पांनी वसईच्या पोर्तुगीजांविरुद्धच्या विजयानंतर आणलेली एक पंचधातूची मोठी घंटा आहे. अशीच अजुन एक घंटा तुम्ही थेऊरच्या अष्टविनायक गणपती मंदिरात नक्की बघितली असेल. त्याव्यतिरीक्त वाड्यामध्ये असलेली तैलचित्रे पण खूप सुंदर आहेत. मेणवलीचे आणखी एक महत्व म्हणजे १९४२ च्या “भारत छोडो” आंदोलनच्या वेळेस नानासाहेब पाटिलांनी स्थापन केलेले “पत्री सरकार” पण आपल्या कारभारासाठी मेणवली गावाचा वापर करायचे.

पण सध्याच्या काळात मेणवली गाजते आहे ते बॉलिवुडवाल्यांमुळे.  स्वदेसच्या आधी इथे सर्जा, युद्ध, जिस देस मे गंगा रेहता है, गंगाजल, मृत्युदंड आणि गूंज उठी शहनाई या चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे, तर संजय लीला भंसाळींचा “बाजीराव-मस्तानी” व हॉलिवुडचा “द ईंव्हेडर” या इंग्रजी चित्रपटाचे काम पण इथेच होणार आहे.

महाबळेश्वर-पाचगणीच्या वाटेवर, वाईहून अगदी दहा मिनीटांच्या रस्त्यावर असलेले मेणवली हा कृष्णेच्या काठावरचा कराडसारखाच अजुन एक दागिना.

twotemples.jpg 

( फोटोमध्ये उजवीकडचे मंदिर मेणेश्वराचे तर डावीकडे पाठीमागे असलेले मंदिर विष्णुचे आहे. )

 माहिती व छायाचित्रांसाठी या संकेतस्थळांचे आभार.

१) http://ramrao2.tripod.com/Menavali.html

२)  http://outdoors.webshots.com/photo/1528797560074388040QxBXii 

३) http://www.nanachimenavli.com/ 

Advertisements

6 प्रतिक्रिया

Filed under महाराष्ट्र.

6 responses to “स्वदेसमधील चरणपूर

 1. खूपच छान माहिती दिलीत तुम्ही…आता महाबळेश्वरला जाण्याआधी मेणवलीला जाण्याचा निश्चय करून टाकला.

 2. Kunal

  Apekshe pramane rahul tu karad nantarcha blog adhik sunder lihila ahes. Sobat cha chitra parisarashi jawalik sadhun deta.
  Mala ata asa watayla lagla ahe ki mi kahich firlo nahi ahe. Tymule ata India la gelo ki Menavli la sudhha nakki janar. Ani ho tu jar tevha aschil tar tuzya barobar jane mi pasant karin.
  Kunal

 3. milan nalawade

  kharach khoopach chann mahiti aahe. aata amhi tyaa thikani nakki jau. THANKS

 4. Suresh Mahamuni

  lihitana man abhimanane bharoon yetay, karan maza gavach aahe ha.
  matra khant hi titkich vatke ki..AAMHIch he vaibhav etke divas sarvana kaa dakhavale nahi.?
  dusryani lihilyavar/pahilyavarch ka aamhala aamcha ha amulya theva janavato ?
  taripan…
  aapan yaa !!
  kahi madat/mahiti havi aasel tar jarur sanga…

  currenty I am working in Mumbai.
  but my friends (gavvale dhost) –
  Mohan Nimbalkar,
  Ramdas Nimbalkar,
  Anil B Chaudhari,
  Sunil H Chaudhari
  and many more are ready to help you.
  Warm Welcome !!!!

 5. अश्विनी, कुणाल आणि मिनल….प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!

  सुरेश…मेणवलीकरांचे मनोगत ऐकून खुप बरे वाटले. मेणवली बद्दल search केले तर येवढी माहिती मिळाली की माझ्या blog मध्ये सगळे थोडक्यात लिहीतांना मनात असून सुध्दा बऱ्याच गोष्टी वगळाव्या लागल्या. पण तुमची प्रतीक्रीया वाचुन निदान मेणवलीबाबत, थोडे का होइना, पण चांगले लिहील्याचे समाधान मिळाले.
  आता मेणवलीची पुढे कशी प्रगती करायची हा निर्णय तुम्ही गावकऱ्यांनी घ्यायचा आहे. योग्य प्रयत्न केल्यास वाई-मेणवली-धोम धरण-धोम गावातील नृसिंहाचे मंदिर-पांडवगड-रास्तेवाडा या सगळयाचे एक मराठमोळी पर्यटन आकर्षण म्हणुन development करणे शक्य आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s