थॅंक्यू मन्ना डे!

एखाद्या शुक्रवारी सर्वांनी एकत्र जमायचे आणि पार्टी करायची हा इथे शिकणाया आम्हा मित्रांचा अगदी आवडता ठरलेला कार्यक्रम. दंगा, मस्ती, नाचगाणे माणसांनी भरलेले घरपिणारे पीत असतात, तर पिणारे नुसतेच कोक किंवा स्प्राईटचे घोट घेत असतात. मग थोडे वातावरण थंड झाले की एक जण गिटार काढतो. परवा पण आगदी असंच झाले….आणि मग गिटारच्या साथीने आमच्या आवडत्या गाण्यांची मैफ़िल सुरु झाली.

सुरुवात झाली ती डूबा डूबा रेहता हुं पासनं..मग जरा नज़र हटाके देखो, तुss पुकार लो, दो दिल मिल रहे है वगैर गाणी झालीपण मैफ़िल या अर्थाने रंगली ती मन्ना डे यांचे मेरे प्यारे वतनगाणे लावल्यावर.

सलील चौधरींचे अफाट संगीत, त्यात गुलजारचे शब्द म्हणजे दुधात साखरआणि वर हे सर्व कमी होतं की काय असं वाटावे असा मन्ना डें चा अप्रतीम आवाज़…… भारतात असताना हे गाणे मी शंभर वेळा ऐकले असेल आणि तेव्हाही मला ते खुप आवडायचे. पण इथे साता समुद्रापार आल्यावरती हे गाणे ऐकले ना, की त्या आवाजातलादर्दया अर्थाने समजतो. गाण्यातला शब्द अन शब्द तुमच्या मनाला जाऊन भीडतो, अगदी व्याकुळ करुन सोडतो.

मेरे प्यारे वतन, मेरे बिछडे चमन,

तुझपे दिल कूर्बान।तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू,

तू ही मेरी ज़ान॥

जसे जसे गाणे पुढे जाते तसा तसा प्रत्येक जण एका वेगळ्याच दुनियेत जायला लागतोकेवढे सुरेल संगीत, नुसतं देशप्रेमालच नाही तर अगदी खोलवर जाऊन भारताशी जडलेल्या सर्व आठवणींना प्रवृत्त करणारे बोल.

तेरे दामन से जो आए, उन हवाओं को सलाम,

चूम लू मैं उस जुबां को जिसपे आए तेरा नाम,

सबसे प्यारी सुबह तेरी, सबसे रंगी तेरी शाम,

तुझपे दिल कूर्बान॥१॥

मला एकदम आठवले ते मागे न्यु यॉर्कला गेलो होतो तेव्हाचा प्रसंग. एकदा आम्ही कुठेतरी रांगेत उभे होतो, तर रस्त्यावर व्हायोलीन वाजवणाया एका माणसाने, आम्ही भारतीय आहोत हे बघूनजन गण मनवाजवले होते. आम्ही सगळे त्याच्यावर एकदम खुष! त्याला बक्षीस तर दिलंच शिवाय त्याचे तोंड भरून कौतुक पण केले. मग मला पटले ..खरचं ..”चूम लू मैं उस जुबां को जिसपे आए तेरा नाम“. हे सगळे आठवते आहे तोवर मन्ना डेंनी पुढचे कडवे सुरु केले

मां का दिल बनके कभी सीनेसे लग जाता है तू,

और कभी नन्हीसी बेटी बनके याद आता है तू,

जीतना याद आता है मुझको, उतना तडपाता है तू,

तुझपे दिल कूर्बान॥२॥

या काडव्याबद्दल तर काय लिहावे. “आईया एकाच शब्दात प्रत्येक माणसाच्या इतक्या ओल्या भावना जडलेल्या असतात की हे वाक्यच सगळे काही बोलून जाते..” जीतना याद आता है मुझको, उतना तडपाता है तू“.

पण सर्वात जास्त त्रास देते ते गाण्याचे शेवटचे कडवे..

छोडकर तेरी जमीं को दूर पहुचे है हम,

फ़िरभी है यहीं तमन्ना तेरे ज़र्रो की कसम,

हम जहां पैदा हुये, उस जगह ही निकले दम,

तुझपे दिल कूर्बान॥३॥

आधीच्या कडव्यांनी जो माहौल निर्माण केला आहे त्याचा पर्मोच्च बिंदु म्हणजे हे शेवटचे कडवे. “हम जहां पैदा हुये, उस जगह ही निकले दमभारतापसून दूर आलेल्या लोकांनाच यातल्या या भावना समजतील.

सहाजीकच गाणे संपल्यावर आम्ही सर्व जण या गाण्याच्या नेशेमध्ये बराच वेळ बेहोष झालो होतो….थॅंक्यू मन्ना डे, गुलज़ार आणि सलील चौधरी!!

Advertisements

7 प्रतिक्रिया

Filed under कविता

7 responses to “थॅंक्यू मन्ना डे!

 1. Siddb

  I agree to whatever Rahul says……i was with him…cant seem to forget those times…thnk u Manade.Thank you India!

 2. Hi – I dont want to disturb your nostalgia, and I am a big fan of Manna De, Gulzar and this particular song.
  But do you think Gulzar wrote this song for Pakistan and not for India?
  Nevertheless, it is still relevent for all the people (in any country) – who have left their motherland.

 3. Hi Krushnakath,

  I am waiting for new posts from you. Its been almost a month now.Please keep them flowing…like Krushna.

 4. Anonymous

  This may sound trivial, but best to my knowledge it was Prem Dhawan and not Gulzar who wrote this song. Gulzar wrote the song “ganga aaye kahan se” in Kabuliwala. Some websites also mention “aye mere pyaare watan” as a work by Gulzar, but it is not the fact.

 5. हे गीत प्रेम धवन यांनी लिहीले असल्यास मला माहीती नाही. काबूलीवालाच्या नेटरील माहीतीमध्ये तरी गीतकाराचे नाव गुलजारच आहे. जरका खरंच हे गीत प्रेम धवन यांनी लिहीले असल्यास, कृपया पूर्ण माहीती द्यावी. मी वरील लेखामध्ये तसा बदल करतो.

  धन्यवाद!

 6. jaivant

  nathing matter who wrote song , ha lekh manala bhidla tumchya bhavna ati mahatvachya asach bharbharun liha

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s