बिल गेटस विरुद्ध स्टीव्ह जॉब्स!

pirates.jpg

 मध्यंतरी एक मस्त चित्रपट पाहिला….’Pirates of the Silicon Valley’. नविन महितीचा दरवाजा एकदम उघडला की कसे होते ना ………….तसे झाले काहीतरी. तेव्हापासून रोज इंटरनेटवर Steve Jobs आणि Bill Gates संबंधीत माहिती शोधायचे वेडच लागले आहे.

हा चित्रपट Microsoftचा बिल गेटस  आणि Apple चा स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवनावर आणि त्यांच्यामधील स्पर्धेवर आधारित आहे.  मुख्य म्हणजे पात्रांची व सर्व वस्तवातील संदर्भांची नावे जशीच्या-तशी ठेवली आहेत …जसे Machintosh, Windows वगैरे. त्यामुळे चित्रपट पाहतानाच आपण नकळत आपल्या आवती भवतीच्या गोष्टींशी त्याचा संबंध लावायला लागतो. चित्रपटची सुरुवात स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेटस यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून होते. पण कथेतील मुख्य विषय हा Apple आणि Microsoft मधील स्पर्धा आहे!

Mouse चे तंत्रज्ञान सर्वात पहिल्यांदा Xerox च्या प्रयोगशाळेने शोधले होते म्हणे. पण दूर्दैवाने त्यांच्या सा.मो.सा.ला (साहेबाच्या मोठ्या साहेबाला) तो प्रकार काय आहे हे झेपलेच नाही आणि त्यांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले. मग ते तंत्रज्ञान Xerox कडून Steve Jobs ने विकत घेतले आणि Machintosh बाजारात आणला. बिल गेटस तेव्हा IBM च्या PC साठी Operating System तयार करत होता. त्याने मग स्टीव्ह जॉब्सला हरब-याच्या झाडावर चढवले आणि Apple कडूने हे तंत्रज्ञान चक्क चोरले!!..Now can you beat that? आपण जे Windows रोज वापरतो किंवा आत्ता तुम्ही हा लेख ज्या Windows Operating System च्या मदतीने बघताय त्याचा उदय या चोरीमधून झाला आहे म्हणे!! ( आणि वर हे लोक अशिआयी देशांमध्ये पायरसी चालते म्हणून आरडा ओरडा करत असतात.)

चित्रपट स्टीव्ह जॉब्सवरतीच केंद्रीत आहे. त्यामुळे त्याची आवड-निवड, सवयी, विचित्र वागणे इत्यादी कलाकाराने खूप छान वठवले आहे. सर्वांनी हा चित्रपट जरूर बघवा व ज्या लोकांना स्टीव्ह जॉब्सबद्दल माहिती आहे, त्यांना हा चित्रपट विशेष आवडेल व तो बघून झाला की झपाटलेल्या माणसासारखे नेटवर त्याच्यासंबंधी माहिती शोधतील.

असंच काल स्टीव्ह जॉब्स आणि Apple वरती शोधले असता Apple-Machintosh  च्या जाहिरातींचा हा संग्रह मिळाला. संगणकाला मानवरुप देऊन Apple ने खूप दर्जेदार जाहिरात केली आहे. मला सर्वात जास्त आवडली ती त्यातील PC, Mac आणि जपानी कॅमेराची जाहिरात!

पण अगदी आवर्जून बघावे ते स्टीव्ह जॉब्सचे हे भाषण.

परंतू, दुस-या बाजूने विचार केला तर असे दिसते, की स्टीव्ह जॉब्स ने मायक्रोसॉफ्ट विरुद्ध खूप प्रचार केला. Windowsचे पहिले काही व्हर्जन्स Machintosh वरून छापले असतील असे जरी मानले…तरीपण त्यानंतरचा विकास हा त्यांनी स्वतःहून केला आहे. शिवाय Apple ने सुद्धा सगळे काही स्वतःहून थोडीच विकसीत केले आहे. त्यांना पण Xerox ची मदत घ्यावीच लागली ना. पण म्हणून मायक्रोसॉफ्टने कधी ऍपल विरुद्ध अशी जाहिरातबाजी केल्याचे ऐकीवात नाही! नेटवर शोध घेतल्यास, स्टीव्ह ने नेहमी मायक्रोसॉफ्ट वर तोंडसूख घेतले आहे, पण बिल गेटसने असे कधी जाहिरपणे नाही केले..(उदारणार्थ ह्या दोन मुलाखती: स्टीव्ह आणि बिल गेटस.)

अर्थात स्टीव्ह जॉब्सचे वक्तृत्व मात्र वाखण्याजोगे आहे. १९८३ साली Machintosh बाजारात आला तेव्हाचे स्टीव्हचे हे भाषण आणि जाहिरात जरुर बघावी!

सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे, Appleचे काही शेअर सध्या मायक्रोसॉफ्टच्या मालकीचे आहेत! शेवटी काय हो, सर्व काही धंदा या शब्दाखाली मोडते…आणि आजच्या स्पर्धेच्या जगात कोणी ना कोणी “ध” चा “मा” हा करणारच! मग तो स्टीव्ह जॉब्स असो वा बिल गेटस…………

(वरील विचार हे लेखकाचे वैयक्तीक विचार असून, या लेखामध्ये कोणा विरुद्ध अपप्रचार करायचा कोणताही हेतू नाही.)

(व्हिडिओज च्या संकेतस्थळांसाठी Youtube चे विशेष आभार!)

Advertisements

3 प्रतिक्रिया

Filed under इतर

3 responses to “बिल गेटस विरुद्ध स्टीव्ह जॉब्स!

 1. woww…thanks for this info…i never knew it!
  tya saglya adds baghitalya youtube war…too good..:)

 2. छान माहितीपूर्ण लेख. चित्रपट पाहायला नक्कीच आवडेल.
  स्टीव्ह जॉब्सबद्दल माहिती वाचल्यापासून आणि त्याची त्याच्या वस्तूंच्या सादरीकरणाची पध्दत पाहिल्याबरोबर मी लगेच विंडोजला रामराम ठोकला. आणि त्याच्या मॅकच्या जाहिराती! त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. पण ज्यांनी मॅक वापरला आहे किंवा ज्यांना त्याची माहिती आहे, त्यांनाच त्या जाहिरातींचा आनंद लुटता येतो, नाही का?

 3. आशिष व विशाल, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

  विशाल तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे. Machintosh ज्यांनी वापरला नाही, त्यांना Windows च्या बाहेरचे जग कसे कळणार?

  मध्यंतरी Apple बंगलोर मध्ये एक मोठे कर्यालय उभरणार आहे असे ऐकले होते. पण नंतर तो निणर्य रद्द करण्यात आला. 😦

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s