अ..अ…अलास्का!

अलास्काची ट्रीप करुन आता जवळ जवळ साडेतीन महीने होत आले. बरेच दिवस अलास्कातील अनुभवांबद्दल लिहावे असे मनात आहे. पण नक्की कसे लिहावे हे लक्षात येत नाही. नेहमी प्रमाणे एका टिपीकल प्रवासवर्णनासारखे तर अजिबात लिहायचे नाही आहे. म्हणजे असं बघा मी अमुक-अमुक तारखेला विमानात बसलो, आणि हे-हे पाहिले इत्यादी. थोडक्यात ‘माझी अलास्का सफर’ या नेहमीच्य पध्दतीपेक्षा वेगळ्या पध्दतीने अलास्का कसा मांडावा हे काही सुचतच नाही. शेवटी अलास्काचे अनुभव शीळे होण्याच्या आधीच ते जमतील तसे मांडायचा प्रयत्न करतोय.

अलास्काबाबत पूवीची ओळख म्हणजे सातवी-आठवीच्या भूगोलात टुंड्रा आणि तैगा प्रदेशाच्या पट्ट्यात येणारे उत्तर अमेरीकेतील राज्य किंवा तिथे रात्री दिसणा-या अरोरा बोरीयोलीसच्या संदर्भात ऐकली होती तेवढीच. पण गेली काही वर्षे तिकडे शिकायला गेलेल्या मित्र-मैत्रिणींकडून तिथल्या निसर्गसौदर्याचे जे वर्णन ऐकत होतो, त्याने अलास्काला जाण्याची उत्सुकता exponentially वाढतच गेली. सॅक पाठीला अडकवली, कॅमेरा गळ्यात घातला आणि एकट्यानेच पाच दिवस अलास्कात जाऊन गाडी दामटवली. हो…अगदी दामटवलीच म्हणावे लागेल! कारण लोकवस्ती कमी असल्यामुळे तिकडे रस्त्यावर जेमतेम चार गाड्या.  त्यामुळे पु. लं. चे गाडी “चालवणे” हे पुणेरी क्रियापद जरी गाडी तशी “चालवता” येत असली तरीही मला इथे अजिबात वपरता येणार नाही. भाड्याने घेतलेली पावरबाज गाडी, मोकळे रस्ते आणि जोडीला आर्टिक प्रदेशाचा २४ पैकी २१ तासांचा लख्ख सुर्यप्रकाश.  मग वगमर्यादेची पर्वा न करता गाडी सुसाट दामटवायचा मला मोहन रानडे कसा नाही होणार? ( “मोह नरा नडे” ची फोड करुन त्याचा “मोहन रानडे” करण्याची मिस्कील कल्पना आमच्या बाफना सरांची! अर्थात तो मोह मला कुठे नडला मात्र नाही ही गोष्ट निराळी…) त्यात एकटाच असल्यामुळे मनात येईल तिथे आणि मनात येईल तेव्हा कशीही आणि कुठेही गाडी हाकण्याची…माफ करा…दामटवण्याची मुभा. त्यामुळे या कॉक्रीटच्या इंटरस्टेट हायवेजच्या जाळ्यांपेक्षा मला हे डोंगर-द-यात, हिमनदींमध्ये आणि सुचीपर्णी जंगलात मनसोक्त भटकंती करणारे अलास्कातील रस्ते प्रचंड आवडले. म्हणुनच अलास्काबाबतचा पुढचा लेख फक्त अलास्कातील रस्त्यांवर समर्पीत करायचे ठरवले आहे. माझ्या ब्लॉगची गाडी आता आलास्काच्या रस्तत्यांवर दामटवत आहे…आता पुन्हा भेटूया ऍन्करेज-अलास्काला!

 (क्रमश:)

Advertisements

3 प्रतिक्रिया

Filed under महाराष्ट्र.

3 responses to “अ..अ…अलास्का!

 1. Surekh! 21 taas suryaprakash! aani photo avadla! looking fwd to the next post. PuLancha reference mast aahe. Aani tu lihile aahes tase ‘tundra aani taiga’ sodle tar ek joke mhanun Alaska aamchya lahanpani mahit hota –
  Q: Alaska?
  Ans: Ho aalo!

 2. manoj

  Photo ani lekh donhi ekdam mast…. btw krishnakath he nav jitake sundar titakech itar lekh suddha sundar ahet. Mi krishnakathacha asalyamule mala adhikach jivala vatala.

 3. dr.jayant

  lekh pharach changala ahe , vachalya nanter alaskala bhet dyayalach pahijje ase vatate
  baghu keva yog yeto te.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s