रस्ते!!

रस्त्यांचे स्वतःचे असे एक व्यक्तिमत्व असते….जसे की उत्साही रस्ते, तरुण रस्ते, बंडखोर रस्ते, निसर्गरम्य रस्ते, नटलेले रस्ते, विजयी रस्ते…एक ना अनेक अशी विशेषणे आहेत की जी तुम्ही रस्त्यांना लावलीत तर तुम्हाला त्या विशेषणाचा अर्थ पूर्ण करणारा असा एकतरी रस्ता आठवेलच. दलाल स्ट्रीट पासून ते वॅल स्ट्रीट पर्यंत, शिवाजी रोड पासुन ते राजपथ पर्यंत आणि सिल्क रूट पासून ते ग्रॅन्ट ट्रंक रोड पर्यंत प्रत्येक रस्त्यांची एक आयकॉनीक ईमेज असते.

मागच्या लेखातील अलास्काची हरवलेली वाट पुन्हा एकदा तुडवण्याचा प्रयत्न या लेखात करतोय. तस म्हंटले तर अलास्का हे रस्त्यावरुनच बघायचा प्रदेश आहे. एक शहर ते दुसरे शहर तुम्ही विमानाने गेलात तर तुम्हाला अलास्कातील बर्फाच्छादीत पर्वतांची, ग्लॅशीयर्स ची, सुचीपर्णी वृक्षांची, ओळखच होणार नाही. अलास्काला जायच्या आधी मला देवदत्त म्हणाला होता….”ऍन्करेज ते वालदीज सात तासांचा रस्ता आहे…वाटेत मध्ये ३०० मैल एकही गाव नाही आणि पेट्रोल पंप तर नाहीच नाही….पुढेही तसेच….पण रस्ता अत्यंत निसर्गरम्य आहे. इट्स वर्थ डुईंग इट.”…आणि खरच….मला अलास्कातील सगळेच रस्ते आनंद देऊन गेले.

अलास्कातील हायवेज हे द्रुतगती महामर्ग नसून, नागमोडी वळनांचे, द-याखो-यातून जाणारे रस्ते आहेत. त्यामुळे ते आपल्याल तेथील नसर्गच्या अगदी जवळ घेऊन जातात. ( मला कधी कधी जुना मुंबई-पुणे रस्ता जास्त आवडतो. नवीन एक्सप्रेसवे मध्ये आपल्याला कवितेतल्या “खंडाळ्याचो घाटाची” ओळख नाही होत)

परवा नॅशनल जिओग्राफिकच्या वेबसाईट वर “Drives of Lifetime: World’s Greatest Scenic Routes” असा एक लेख वाचला. जगातले अत्यंत निसर्गरम्य रस्त्यांची त्यामध्ये महिती दिलेली होती. ती यादी बघायच्या आधीच मला खत्री होती की त्यात अलास्कातील एक तरी रस्ता असेलच. …आणि Route-1 तर नक्किच असेल. आणि खरोखरच यादीत Route-1 ऍन्करेग ते सुवर्ड चा रस्ता होता (सोबत जोडलेला नकाशा बघा).

Seward_Highway

Route-1 हा अलास्कातील मुख्य शहर ऍन्करेजला दक्षिणेकडील सुवर्डशी जोडतो. याचे वैशिष्ट्य असं की ह्याच्या एका बाजुला पॅसिफिक महासागर आणि दुस-या बाजुला बर्फाच्छादित डोंगर आहेत. पॅसिफिक महासागराच एक निमुळता भाग आत आला आहे ज्याल टर्गेनियन आर्म (Turganian Arm) असे म्हणतात. रुट-१ ह्या टर्गेनियन आर्मला वळसा घालून जातो. त्यामुळे हा ड्राईव्ह समुद्रकडेनी, नागमोडी वळणावळणाच्या रस्त्याने जातो. सुवर्ड आणि त्याजवळचा केनाई भाग (Kenai Peninsula) इथे असलेल्या अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. वटेत गर्डवुड(girdwood), व्हिट्टियर (Whittier) अशी अजून काही जरुर भेट देण्यासारखी गावे सुद्धा आहेत. या पोस्ट बरोबर काही फोटोज जोडत आहे.

कधी अलास्काला जाणे झाले तर या रुट -१ ला जरूर भेट द्यावी!

Seward Highway, Alaska

Seward Highway, Alaska

Advertisements

3 प्रतिक्रिया

Filed under इतर

3 responses to “रस्ते!!

  1. Dr Ajit Kumthekar MD

    Nice article. Planning a trip to Alaska.
    Guide me as regards stay, economics and safety features

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s