पुन्हा १० वाजून १० मिनिटे

सरदेसाईंच्या ब्लॉग वरचा “१० वाजून १० मिनिटेच का..” लेख वाचला आणि माझ्या कन्या राशीच्या मनाला संशय घ्यायला एक नवा विषय मिळाला!

भानस यांनी दुकानात डिस्प्लेला असणारी घड्याळे नेहमी १० वाजून १० मिनिटेच का दाखवतात याच्या कारणांचे एक मस्त ऍनॅलिसिस केले आहे. शेवटी १० वाजून दहा मिनिटे दाखवण्यामागे घाड्याळाचे सौंदर्य खुलवणे हाच एकमेव हेतू असावा असा निष्कर्ष त्यांनी काढला!

मी सुद्धा लहानपणी १०:१० चे कारण अब्राहम लिंकन यांचा मृत्यु असे कुठेतरी वाचले होते. सरदेसाईंचा लेख वाचून खरे कारण अब्राहम लिंकन यांचा मृत्यु नाही असे कळाले. पण ते खरे कारण नसेल तर ईतर काही असु शकेल का असा मनात विचार आला आणि मी ते कारण शोधण्यासाठी जंग जंग ( अंतरजाल) पछाडले. भानस यांनी अंतरजालावरून जी माहिती संकलीत केली होती त्याच स्वरूपाची माहिती मला सुद्धा मिळाली की खरे कारण सौंदर्य खुलवणे, लोगो नीट दिसणे ईत्यादी…

पण नुकत्याच “दा विंची कोड” पाहून  भा.रा.वीत मनाला असे वाटु लागले की या गुढ १०:१० वाजण्यामागे नक्की कोणतातरी ईतिहासकालीन सरंदर्भ असला पहिजे. मनात आलेले काही लीडस आसे होते:

१) १० वाजून १० मिनिटांच्या घाडाळाचे तासाचे व मिनिटांचे काटे Vitruvian Man चे दोन हात तर दाखवत नसतील ना?

Vitruvian Man हे लियोनार्दो द विंची ने काढलेले चित्र खूप प्रसिद्ध आहे. पूर्वीपासून चित्रकारांनी व मूर्तीकारांनी हे चित्र माणसाच्या अवयवांचे माप घेण्यासाठीचे एक standard म्हणुन वापरले आहे.  Vitruvian Man च्या चित्रात जो गोल आहे तो जर घड्याळ असे समजले तर त्या माणसाच्या वरच्या दोन हातांची टोके साधरण १०:१० वेळ दाखवतात!

Vitruvian Man

द विंची यांचा जन्म १४५२ साली झाल आणि ते १५१९ साली गेले. पहिले तास व मिनिट काटा असलेल्या घड्याळाची नोंद १५६० सालची आहे! मग ही १०:१० ची वेळ द विंची च्या चित्रांवरून तर प्रेरित नसावी का? (संदर्भ: विकिपेडिया)

पण मग १०:१० वेळेसंदर्भात गेल्या १५० वर्षातच ऐकीवात आहे. द विंची किंवा Priory of Scion शी त्याचा काही संबंध असता तर गेले ३००-४०० वर्षे या गूढ १०:१० वेळे संबंधात ऐकण्यात आले असते! शिवाय Priory of Scion चा ईतिहास काल्पनीक आहे असे विकिपेडिया म्हणते. Vitruvian Man चे वरचे दोन हात खांद्यापाशी १२० डिग्री पेक्षा जास्तीचा कोन दाखवता. १०:१० चे काटे सधारण १२० डिग्री कोन दखावतात. ( Vitruvian Man ची कंबर जर चित्रतील गोलाचा मध्य असे मानले तर हाताची टोके साधारण १२०डिग्रीचाच कोन दाखवतील!)

२) Vitruvian Man  सारखेचं यशु ख्रिस्ताबाबत म्हणता येईल. १६५६ पासून Pendulum Clock वापरात आहे. गोल घड्याळ व खालचे Pendulum  असे लक्षात घेतले तर यशुला क्रुसिफ़ाय केलेल्या चित्रतील त्याचे दोन हात म्हणजे १०:१० चे तास-मिनिट काटे असे म्हणता येईल. Pendulum त्याची कंबर व पाय दर्शवू शकतील!

पण जर असे कारण असते तर त्याचा कुठे न कुठ तरी उल्लेख जरूर असता…..युरोपात ख्रिश्चन धर्म असल्यामुळे हे कारण कोणी का लपवेल?

३) ईतिहासात डोकावले तर Geometry आणि Geometrical arrangements/Angles ने माणसाला नेहमी प्रभावित केले आहे. पिरॅमिड असो की अजून काही. १०:१० चे उत्तर कदाचित यातच असेल. गोल घड्याळाला १२० डिग्री व २४०डिग्री मध्ये १:२ प्रमाणात विभागून घाड्याळाची शोभा वाढवणे व लोगो नीट दिसणे हे काम १०:१० ही वेळ अचूक करते! वर १:२ प्रमाणात विभागून सुध्दा घड्याळाची Axis of Symmetry तीच राहते. त्यामुळे सर्व अभ्यास केल्यावर हे तिसरे कारणच खरे कारण असावे असे मलाही वाटते.

१०:१० या वेळेबद्दलच्या कुतूहलाने मनाल चौदाव्या शतकापर्यंत नेले! खरे कारण काहीही असो, १०:१० च्या वेळेपाठीमागे एखद्या कंपनीच्या मार्केटिंग टिमला छान गोष्ट रचता येईल. मग  १०:१० या वेळेचा घड्याळ कंपनीने मार्केटिंग साठी उपयोग केला नसता तरच नवल?

Advertisements

8 प्रतिक्रिया

Filed under इतर

8 responses to “पुन्हा १० वाजून १० मिनिटे

 1. वाह तुम्ही सुद्धा खूप रिसर्च केलेला दिसतोय सरदेसाईस सारखा..आवडली पोस्ट छान झालीय. माहितीपूर्ण

 2. कृष्णाकाठ, तुम्ही अजून पाळेमुळे खणलीत.:) दोन शतकांमागे १०-१० चा उल्लेख सापडत नसल्याने मलातरी इतिहासाशी याचा संदर्भ सापडला नाही. अर्थात मनात मात्र अजूनही वाटते की काही खास कारण असेलच पण…. आता भुंगा लागलाय. पुन्हा घड्याळाचा शोध लावण्यात ब~याच जणांचा हात आहेच आणि तोही वेगवेगळ्या कालावधीत व देशांत. कदाचित खरेच काहीही खास कारण असणारच नाही. केवळ व्यवसाय-मार्केटींग तंत्र…… 🙂

 3. हेमंत आठल्ये

  मी अस ऐकलंय की, ज्याने घड्याळाची निर्मिती केली (शरद पवारांबद्दल मी बोलत नाही आहे ;)), त्याच्या मृत्यू १० वाजून १० मिनिटे आणि ३७ सेकंदाला झाला होता. कदाचित त्याचमुळे बंद घड्याळाची वेळ ती ठेवत असावे.

  • हेमंत,
   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
   घड्याळाच्या निर्मितीमध्ये अनेक देशातील अनेक लोकांचा सहभाग होता आणि ते विकसित व्हायला बरीच वर्षे/शेतके लागली अशी माहिती आंतरजालावर मिळाली….त्यामुळे नक्की कोणत्या व्यक्तीचा मृत्यु या वळेस झाला याबद्दल कोणतीच माहिती उपलब्ध नाही आहे..:-(

 4. हेमंत आठल्ये

  मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s