यू.एस. मुंबई कॉन्सोलेट मध्ये मराठी दुभाषी उपलब्ध नाही?

यू. एस. मुंबई कॉन्सोलेट मध्ये ईंग्रजी न येणा-या लोकांना मराठी, हिंदी व गुजराती मध्ये वीसा ईंटरव्हू देता येतो. मराठी, हिंदी व गुजराती दुभाषी अशा लोकांना मदत करतात.

पण, माझ्या ओळखितील कोणीही जेव्हा “मराठी दुभाषी पहिजे” असे सांगते तेव्हा कधीच तो उपलब्ध नसतो! त्यांना हिंदी दुभाष्या बरोबर ऍडजस्ट करावे लागते.

असा अनुभव अजून कोणाच्या पालकांना / ओळखितील व्यक्तीला आला आहे का?

मराठी दुभाषी मुंबई कॉन्सोलेट मध्ये खरंच उपलब्ध आहे की नाही या बद्दल मला शंका येत आहे…..

Advertisements

5 प्रतिक्रिया

Filed under महाराष्ट्र.

5 responses to “यू.एस. मुंबई कॉन्सोलेट मध्ये मराठी दुभाषी उपलब्ध नाही?

  1. abhijit

    मराठी दुभाष्यासाठी तारखा कधीच उपलब्ध नसतात हा आमचा अनुभव आहे. एक तर दोन किंवा तीन महिन्या नंतरच्या तारखा देतात अन्यथा हिंदी.

  2. असं अजिबात नाही.माझ्या अनेक नातेवाईकांनी मराठीतून मुलाखती दिल्या आहेत. आपण आधीच मराठी भाषेत बोलणार हे जाहीर करावे म्हणजे प्रश्न येत नाही. ऐनवेळेला पण आपण दुभाषा मागू शकतो पण तो नेमका उपलब्ध असेल च असं सांगता येत नाही. या विषयावरचा माझा लेख अवश्य वाचा.

    • @savadhan

      मराठी दुभाषी हवा असे आधीच जाहीर केले असले तरीही तो उपलब्ध नसतो असा अनुभव आम्हाला आला….
      असो, तुम्हाला मराठी दुभाषी मिळाल्याचे ऐकून आनंद झाला…..म्हणजे तो निदान कधीतरी उपलब्ध असतो तर!

  3. माझा अनुभव असा कि, माझे आई वडील आणि सासू-सासरे दोघांनी दुभाषी सांगितला आणि दोघांनी मिळाला. काही लोक लवकर मुलाखत मिळावी म्हणून दुभाषी हवा आहे हे सांगत नाहीत. प्रत्यक्षात गेल्यावर हवा आहे असा सांगितल्यावर तो उपलब्ध नसतो.

    दुभाषी नाही असे होणे अवघड आहे. कॉन्सलेट मध्ये खूप मराठी लोक आहेत. जे वेळ पडल्यास दुभाष्याचं काम करू शकतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s