आले रे गणपती आज दारी रे

आले रे गणपती आज दारी रे
बाप्पा मोरया आनंद झाला माझ्या मना भारी रे॥

सजले मखर हे, फूल माळ ओवली
उजळून आरती, तबकात ठेवली।
मोदकही आवडीचा गोडी त्याची न्यारी रे
आले रे गणपती आज दारी रे॥

टाळ झांजा मृदुंगाचा गजरही घुमला,
बालगोपाळांचा मेळा नाचा मध्ये रमला।
देवा गणेशाचा घोष जय जय भारी रे
आले रे आज गणपती दारी रे॥

परवा गणपतीच्या एका कार्यक्रमासाठी ह्या गाण्याचे बोल शोधत होतो. पण इंटरनेटवर कुठेही या गाण्याचे पूर्ण बोल मिळाले नाहीत. पुन्हा कोणीही ते शोधले तर उपलब्ध असावेत म्हणून हा प्रयत्न.

या गाण्याचा व्हिडिओ युट्यूबवर मिळाला. त्याचा दुवा सोबत जोडत आहे.

Advertisements

2 प्रतिक्रिया

Filed under महाराष्ट्र.

2 responses to “आले रे गणपती आज दारी रे

  1. jayant

    he gan chanach ahe. mala mahit navt, thank you.

  2. मनापासून आभार. मी पण शब्दच शोधत होते. व्हिडीओ सहित मिळालं…उत्तम!
    फार पूर्वी हे गाणं राधा मंगेशकरांच्या आवाजात ऐकल्याचं स्मरतंय..भावसरगम मध्ये ! आठवणीना उजाळा मिळाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s