फणस की डुरियन?

परवा ऑफिसमधील एका युरोपियन माणसा बरोबर जेवायला गेलो होतो. हा माझा सहकारी युरोपियन जरी असला तरी जग फिरला आहे. त्याला विशेष आवडीचा प्रदेश म्हणजे दक्षिण-पूर्व एशिया (विशेषकरून ईंडोनेशिया)! तर आमचे असेच भारत-ईंडोनेशिया विषयी गप्पा चालु होत्या. त्याने मला एक प्रश्न विचारला…

मला म्हणे की तुमच्या इथे ते मोठे पिवळट-हिरवे फळ मिळते का? त्या फळा चे नाव मात्र त्याला आठवत नव्हते 😦
मला म्हणे की ते फळ कलिंगडा येवढे मोठे असते. पण त्याचे वरचे आवरण फारच कडक असते, त्याला असे काटे असतात (thorns ). त्या फळाला म्हणे खूप उग्र वास असतो. त्याच्या आत मध्ये माऊ पिवळ्या रंगाचा गर असतो….

फणस

आता हे सगळे ऐकल्यावर मी एकदम म्हणालो की “फणस”. पण मला फणसाचे इंग्रजी मधील नाव काही केल्या तेव्हा आठवले नाही…आम्ही ती चर्चा मग तिथेच थांबवली.

माझी मात्र फणसाचे इंग्रजीतील नाव का आठवत नाही आहे यामुळे थोडी चिडचिड झाली होती. परत कामावर आल्यावर “फणस” देवनागरीत गुगल केले आणि एकदम “Jackfruit” आठवले! मग त्या मित्राला ” तुला Jackfruit म्हणायचे होते का?” असा ईमेल केला. सोबत फणसाचे विकिपेडियावरचे वेबपेज सुद्धा जोडले.

तर त्या पठ्याने मला परत ईमेल केला जो मला फारच “Interesting” वाटला. तो म्हणे…” ha ha…I was NOT talking about Jackfruit……Now I need to taste Jackfruit and you Durian!” त्याने सोबत डुरियनची माहिती देणारे विकिपेडियाचे वेबपेज सुद्धा जोडले होते. त्यावर टिचकी मारली तर काय आश्चर्य…अगदी फणसाचा भाऊ/बहिण वाटत होतं हे डुरियन म्हणजे! (सोबत डुरियनचे चित्र जोडत आहे)

डुरियन (विकिपेडिया छायाचित्र)

मग मात्र मी खरचं उत्सुक झालो. गुगल वर ” Durian Jackfruit”  असे शोधले तर भरपूर माहिती मिळाली. बाहेरून दिसायला जरी फणस आणि डुरियन सारखे दिसत असले तरीही त्या दोघांमध्ये बराच फरक आहे म्हणे. त्यातील काही प्रमुख फरक असे:

१) लोकांचे म्हणणे असे आहे की डुरियन ची चव आंबा-केळे-चीझ-कांदा-लसूण एकत्र केले तर कसे लागतील तशे असते….बापरे!!…थोडक्यात लोक म्हणतात की तुम्हाला डुरियन एकतर प्रचंड आवडेल किंवा अजिबात आवडणार नाही! फणस गोडसर असल्यामुळे ब-याच लोकांना आवडतो.
२) डुरियनचा वास फरच उग्र असतो. काही लोकांना तो वास बिलकूल आवडत नाही तर काहींना तो प्रचंड आवडतो. फणसाचा वास त्यामनाने बराच मवाळ आहे.
३) डुरियनचे कवच फणसापेक्षा जास्त कडक व कापण्यास अवघड असते
४) डुरियनच आकार फणसापेक्षा थोडा लहान असतो पण त्याचे काटे फणसापेक्षा बरेच मोठे असतात

आपल्याकडे जसं नारळाला मान आहे तसचं दक्षिण-पूर्व एशियात डुरियनला आहे म्हणे. तिकडे त्याला “फळांचा राजा” म्हणतात. ईंडोनेशिया, मलेशिया आणि ब्रुनेई हे डुरियचे मूळ देश. मात्र आता थायलंड, फिलिपिन्स ई. ठिकाणी सुद्धा त्याची लागवड केली जाते. भारतातही डुरियचे पिक काही ठिकाणी घेतले जाते असे वाचण्यात आले आहे.

मागच्या भारत दौ-यात एकदा विलायती फणसाचे झाड बघितले होते. विलायती फणसाचा आकार नेहमीच्या फणसापेक्षा थोडा छोटा होता. मग  मनात विचार आला की आपण ज्याला विलायती फणस म्हणतो तोच डुरियन का?

विलायती फणस

काल माझ्या मामी बरोबर या विषयावर बोललो. ती कोकणात वाढलेली आणि तिच्या माहेरी आंबा-फणसाच्या बागा आहेत. ती म्हणाली की विलायती फणस नेहमीच्या फणसा-सारखाच असतो. त्यामुळे विलायती फणस हा डुरियन नाही आहे. आज आमच्या ऑफिसमध्ये एका थाई मुलीशी डुरियन विषयी विचारले. तीने एका दक्षिण-पूर्व आशियाई सामान मिळणा-या दुकानाचा पत्ता दिला आहे..म्हणे की तिकडे फ्रोझन डुरियन मिळेल. आता ते विकत घेऊन खाईन….

संदर्भ:

 1. http://en.wikipedia.org/wiki/Durian
 2. http://tucsoncitizen.com/morgue/2008/08/27/94926-direct-from-asia-yummy-jackfruit-smelly-durian/
 3. Test
Advertisements

4 प्रतिक्रिया

Filed under इतर

4 responses to “फणस की डुरियन?

 1. Agraja

  Mi tujhe saglech lekh vachat aste pan mala ek janavt ahe ki tujha divsen divas kontyahi vishay lihaychya adhi tya baddal lokan barobar charcha karun mag sarva bajuni vichar karnyachi vrutii disun yete.

  Saglyat jasti hya lekha madhye tu keleli don falatli comparison ani mag kasa tu eka conclusion la alas te avadte.

 2. jayant

  khupach mast don phalatala farak dakhavala ahes. good.

 3. abhijeet

  photo farach chan mala vatate ki vilayati mhanun dakhavlela fanas ha neer fanas navane olkhala jato

 4. PALLAVI BAGWE

  विलायती फणसयाची कापे करावी. त्याला भरपूर हिंग, तिखट, हळद, मीठ लावून थोडे वेळ ठेवावे.
  तांदळाचे पीठ लावून मस्त फ्राय करावी. अगदी माशासारखी लागतात. श्रावणात करून बघा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s